ठाण्यामध्ये भाजपात गुन्हेगारांचे इनकमिंग सुरूच

By Admin | Updated: February 9, 2017 05:32 IST2017-02-09T05:32:05+5:302017-02-09T05:32:05+5:30

‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांच्या पक्षप्रवेशाची मालिका सुरूच आहे. ठाणे आणि मुंबई परिसरांत भांडुप आणि वर्तकनगर पोलीस

In the Thane, the BJP has started incoming incoming calls | ठाण्यामध्ये भाजपात गुन्हेगारांचे इनकमिंग सुरूच

ठाण्यामध्ये भाजपात गुन्हेगारांचे इनकमिंग सुरूच

ठाणे : ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरूद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांच्या पक्षप्रवेशाची मालिका सुरूच आहे. ठाणे आणि मुंबई परिसरांत भांडुप आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे आठ ते दहा गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार मयूर शिंदे याने मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपाचे नेते तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या साक्षीनेच त्याला प्रवेश देण्यात आला आहे. त्याच्या प्रवेशाने अनेक कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. तो मुंबईत शिवसेनेच्या एका आमदाराचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. त्याच्या मदतीनेच तो शिवसेनेच्या तिकिटावर ठाणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता. मात्र, सेनेतून त्याला उमेदवारी न मिळाल्याने त्याने थेट भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the Thane, the BJP has started incoming incoming calls