सहकारी बॅँक्स असोच्या कार्याध्यक्षपदी ठाकूर

By Admin | Updated: August 12, 2015 02:05 IST2015-08-12T02:05:16+5:302015-08-12T02:05:16+5:30

दी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी विश्वास को-आॅप. बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. बॅँक्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील सर्व

Thakur as the working president of the co-operative banks | सहकारी बॅँक्स असोच्या कार्याध्यक्षपदी ठाकूर

सहकारी बॅँक्स असोच्या कार्याध्यक्षपदी ठाकूर

नाशिक : दी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी विश्वास को-आॅप. बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. बॅँक्स असोसिएशन ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कामकाजात समन्वय साधणारी प्रमुख संस्था आहे.
सहकारी बँकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे व तेथील उत्कृष्ट बँकांच्या कार्यप्रणाली समजून घेऊन त्याचा फायदा महाराष्ट्रातील इतर बँकांना करून देणे, शिवाय बँकांचे मजबुतीकरण, आधुनिकीकरण यावर आपला भर राहणार असल्याचा निर्धार विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. आहे. ठाकूर यांनी सरकारी समित्यांसह अनेक संस्थांवर काम पाहत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणाऱ्या शासनाच्या अनेक समित्यांमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: Thakur as the working president of the co-operative banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.