शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Rain: राज्यात पुन्हा वळवाचे थैमान, वीज पडून दोघांचा बळी; अवकाळी पाऊस अन् उष्णतेच्या लाटांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 06:24 IST

Rain In Maharashtra: राज्यातील नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, पुणे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारी झालेल्या पावसाने दोघांचा बळी घेतला आहे.

मुंबई : राज्यातील नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, पुणे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारी झालेल्या पावसाने दोघांचा बळी घेतला आहे. बुलडाणा व बीड जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून पाच बैल ठार झाले. पुढील २४ तासांत संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात पांगरा येथील  शेतकरी शंकर धोंडिबा घोरबांड (३०) हे शेतामध्ये हळद शिजवत असताना अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडोदा (जि. बुलडाणा) येथे झाडाखाली उभ्या असलेल्या ५४ वर्षीय रवींद्र वाघमारे यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी घडली. बीड जिल्ह्यात सादोळा व पवारवाडी या दोन गावांच्या शिवारात बुधवारी रात्री वीज कोसळून पाच ५ बैल ठार झाले. हिंगोली जिल्ह्यातही गडगडाटासह पाऊस झाला. 

नाशिकलाही वादळी पाऊसबागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. फकीरवाडी आदिवासी वस्तीजवळ बाभळीच्या झाडावर वीज पडून झाड जळाले. पाटणादेवी (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे वादळामुळे उडाले.

नागपूरलाही झोडपले वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने गुरुवारी नागपूर शहरालाही झोडपले. काही ठिकाणी गारपीटही झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पड़ली. 

उष्णतेच्या लाटेचा इशारा- मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेचा तडाखा गुरुवारीही अनुभवला.  - आज, शुक्रवारपासून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे मुंबईतील चटके कमी होण्याची शक्यता आहे. - पुढील २४ तासांसाठी संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकणाला पुढील २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

कुठे किती कमाल तापमान?जळगाव        ४१.७ सोलापूर        ४१.१ परभणी        ४० बारामती        ३८.८ सांगली        ३८.६ पुणे        ३८.४ सातारा        ३७.६ मुंबई        ३७.३ कोल्हापूर        ३७.१ नाशिक        ३६.९

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र