बदनापूरच्या आमदाराची पोलिसाला धमकी
By Admin | Updated: September 7, 2015 00:53 IST2015-09-07T00:53:34+5:302015-09-07T00:53:34+5:30
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी रविवारी सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांचे सुरक्षारक्षक पोलीस कॉन्स्टेबल सागर साठे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला.

बदनापूरच्या आमदाराची पोलिसाला धमकी
औरंगाबाद : बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी रविवारी सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांचे सुरक्षारक्षक पोलीस कॉन्स्टेबल सागर साठे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला.
कुचे यांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, बाहेती हे दुपारी त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले होते. त्यांनी साठे यांच्याकडे त्यांचा मोबाइल दिला होता. कुचे यांनी बाहेती यांच्या मोबाइलवर फोन केला. तेव्हा फोनवर साठे यांच्याशी बोलताना कुचे यांनी बाहेती यांना उद्देशून अरेरावीची भाषा करीत साठे यांना शिवीगाळ करत धमक्या देण्यास सुरुवात केली. कुचे यांनी मात्र शिवीगाळ केल्याचा इन्कार केला आहे. (प्रतिनिधी)