शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

ठाकरेच की पुन्हा फडणवीस? राजकीय भूकंपानंतर अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे, घराघरात एकच चर्चा आता काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 08:15 IST

Eknath Shinde: विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी सोमवारी महाविकास आघाडीला केलेली जखम ओली असतानाच शिंदे सुरतमध्ये समर्थकांसह पोहोचले असल्याचे वृत्त मंगळवारी सकाळीच धडकले. एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला.

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत फडणवीस यांनी सोमवारी महाविकास आघाडीला केलेली जखम ओली असतानाच शिंदे सुरतमध्ये समर्थकांसह पोहोचले असल्याचे वृत्त मंगळवारी सकाळीच धडकले. एकच खळबळ उडाली. दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला. सुरतमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचलेले नार्वेकर यांनी शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. मात्र आपली अट मान्य करा या भूमिकेवर शिंदे ठाम राहिल्याची माहिती आहे.निष्ठांवत शिवसैनिक असलेल्या शिंदेंच्या बंडाने शिवसेनेला हादरा बसला.  शिंदेंसोबत ३० हून अधिक आमदार असल्याच्या वृत्ताने सरकारवरील संकट गहिरे होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होत आहे. सरकार स्थिर असल्याचा दावा तिन्ही पक्षांनी केला आहे.

भाजपसोबत न जाण्यावरमुख्यमंत्री ठाकरे ठामआपण भाजपसोबत आधी पाच वर्षे सत्तेत होतो. त्यावेळी त्यांनी आपल्याला किती त्रास दिला. आज आपले सरकार आहे तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्रास सुरूच आहे, अशावेळी भाजपसोबत कशाला जायचे, अस्मिता महत्त्वाची नाही का, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर घेतलेल्या आमदार, खासदारांच्या बैठकीत घातली. शिंदे यांचा प्रस्ताव स्वीकारायचा नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. शिंदे लवकरच आपल्यात परत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच बैठकीत एक विद्यमान आणि एका माजी मंत्र्यांनी शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार करावा अशी गळ ठाकरे यांना घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा; दूतांची शिष्टाई निष्फळउद्धव ठाकरेंचे दूत म्हणून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व आ.रवींद्र फाटक यांनी सुरतला जावून शिंदे यांच्याशी चर्चा केली.परत या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, असे साकडे घातले पण शिंदे यांनी त्यास साफ नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मुंबईत या, भेटून बोलू असे ठाकरे म्हणाले पण शिंदे यांनी आधी अटी मान्य करा मग बघू असे सांगिल्याचे समजते.

शरद पवार यांची पक्ष सहकाऱ्यांशी चर्चाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री दिल्लीहून परतल्यानंतर सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली.

शिंदेंना हटविले, चौधरींना संधीशिवसेनेच्या विधानसभेतील गटनेते पदावरून शिंदे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हटविले आहे. तसे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना देण्यात येणार आहे. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदारांचा गुंगारा, गुप्तचर यंत्रणेचे अपयशएकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी विधानभवनात आले. मतदानानंतर ते निघाले. त्यांच्या पाठोपाठ समर्थक आमदारांच्या गाड्या एकेक करून निघाल्या. या हालचालींची राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला कल्पना आली नाही का, मुख्यमंत्र्यांना त्यांनी माहिती दिली नाही का, मंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा असते, गुजरातच्या सीमेपर्यंत पोलीस त्यांच्यासोबत होते,तरीही मंत्री, आमदारांच्या हालचालींची माहिती वर्षावर कशी दिली गेली नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

असे घडले नाट्य...पहाटे ३:३० एकनाश शिंदे यांची बंडाळी आणि आमदारांच्या सुरतवारीने ‘वर्षा’ निवासस्थानावरील वर्दळ वाढली.सकाळी ११‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना नेत्यांना पाचारणn ‘रॉयल स्टोन’ या शासकीय निवासस्थानी काँग्रेस आमदारांची तातडीची बैठक११:३०राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवातदुपारी १२ शिवसेना आमदार, नेत्यांची ‘वर्षा’वर बैठक.२:००भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषदn राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत पत्रकार परिषदn शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक सुरतच्या दिशेने रवाना३:००राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसकडून कमलनाथ यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती सायं. ५:०० मिलिंद नार्वेकर आणि फाटक सुरतमध्ये दाखल६:००शिंदे यांच्यासोबतची बैठक संपवून नार्वेकर-फाटक मुंबईकडे रवानाn ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक रात्री ८:००शरद पवार दिल्लीहून मुंबईत दाखल ८:३०  प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना