शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 14:02 IST

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र होता कामा नये, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली.

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: पोलिसांना सतत गुंगारा देणारा ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. यामागे कोणाचा हात आहे, त्या सर्वांची नावे सांगणार, असा दावा केल्याने खळबळ उडाली. मात्र, ललित पाटील याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 

ललित पाटीलला अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वांचे तोंड बंद होणार, दोषींवर योग्य कारवाई करु, असे म्हटले होते. यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तोंड बंद करणार म्हणजे काय करणार? संपवून टाकाल? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवले तसे अडकवाल? देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. जो कोणी ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत राहावे, अशी तुम्ही धमकी देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस पळालो नाही तर मला पळवले, असे का म्हणतो याचा शोध घ्या, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. 

शंभूराज देसाई एवढे का चिडले?

माझ्याकडील सर्व पुरावे माध्यमांसमोर ठेवले आहेत. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेणे तपास करावा, अशी मागणी केली आहे. दादा भुसे यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली त्यांचे स्वागत करते. पण शंभूराज देसाई एवढे का चिडले? राज्य शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई नापास झाले. ड्रग्जचा कारखाना उभा राहतो आणि तुम्हाला माहिती नाहीत तर तुमचे अपयश आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

दरम्यान, ललित पाटीलचा जयसिंगहानी होऊ नये. ललित पाटीलला जर अटक करण्याचे श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय त्यांना घ्यावे लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मग त्यांना माहिती होती का, ललित पाटील याने फरार होणे आणि आता त्याला अटक होणे. या सगळ्यात नेमके काय गौडबंगाल काय आहे, ज्या हॉटेलमध्ये ललित पाटीलचा वावर होता त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जात आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है? अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली होती. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLalit Patilललित पाटील