शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

“पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील”; राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन ठाकरे गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:18 IST

Maharashtra Politics: फार काही किंमत आम्ही देत नाही, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गट एकामागून एक विविध सभा, यात्रा यांच्या माध्यमातून राज्यभर दौरे करताना दिसत आहे. याशिवाय, पोटनिवडणुकीमुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीच्याही वज्रमूठ सभा राज्यभरात होत आहेत. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेही तयारीला लागली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याची ठाकरे गटाकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रत्नागिरीत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणात संघटन वाढवण्यावर मनसेकडून भर दिला जात असून, यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर खोचक शब्दांत टीका केली. 

पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील

राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याबाबत विनायक राऊत यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले की, फार काही किंमत आम्ही देत नाही. येतील आणि जातील. पिकनिकमुळे अनेकवेळा आले. आमचे त्याबाबत काही आक्षेप नाही. फार त्याची काही दखल घ्यावी असेही मला वाटत नाही, असा टोला विनायक राऊतांनी लगावला.

दरम्यान, गेल्या वर्षी राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. आता पुन्हा ६ मे रोजी ते रत्नागिरीत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या या दौऱ्याविषयी जाहीर करण्यात आले होते. सभा नेमकी कोणत्या मैदानात घ्यायची हे ठरत नव्हते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार होती. मात्र, राजकीय सभेसाठी जागा देणार नसल्याची भूमिका संस्थेने घेतल्याने मनसेने आता कै. प्रमोद महाजन क्रीड संकूल हे ठिकाण निश्चित केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे