शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:59 IST

या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे असा टोला फडणवीसांनी लगावला.

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे यांची बाजू माध्यमांमध्ये भक्कम आणि आक्रमकपणे मांडत असतात. त्यात संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे. 

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. मी गृहमंत्रिपदावर राहिलो नाही तर बरे होईल असं अनेकांना वाटते. पण मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार दिला आहे. जे कुणी चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून मी यापूर्वीही ५ वर्ष कारभार सांभाळला आहे. आताही जे बेकायदेशीर कामे करतील त्यांना सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. दरम्यान, मी कुणाला घाबरत नाही. कुणाला दबत नाही असंही त्यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात आमदार सुनील राऊत यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. वारंवार धमक्या येत असतात. याबाबत गृहमंत्री, पोलिसांना सांगूनही कारवाई होत नाही. आज पुन्हा धमकी आली आहे. वरिष्ठांना कळवले आहेत. माझ्या घरी, वारंवार धमक्या येत असतात. संजय राऊत हे महाराष्ट्राचे नव्हे तर आता देशाचे नेते आहेत. अशा व्यक्तीला धमक्या येऊनही कारवाई केली जात नाही असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत