शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

राज ठाकरेंचा प्रश्न योग्य, हे सगळं ठरवून चाललंय; संजय राऊतांना 'तो' मुद्दा 'मनसे' पटतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:01 IST

Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे. हे सगळे ठरवून चालले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एका मुद्द्याला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. यावर संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाष्य केले.

राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे, मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत

सरकारने अध्यादेश काढला पण खरच आरक्षण मिळाले आहे का अशी अनेकांना शंका  आहे. राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे. मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे.  मंत्रिमंडळात मतभेद स्पष्ट दिसतात. छगन भुजबळ वेगळी तर देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्र्याची भूमिका ही सरकारची असायला हवी. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळे ठरवून चालले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचे आम्ही ओबीसींच्या बाजूने बोलणार. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते मंत्री विरोधात भूमिका घेत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस हवी. तसे होत नाही म्हणजे त्यांची मिलीभगत आहे. हे केंद्राच्या हातातील अधिकार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे