शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मविआ जागावाटप: उद्धव ठाकरे चर्चेसाठी दिल्लीला जाणार? संजय राऊतांचे सूचक भाष्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:58 IST

Maha Vikas Aghadi News: जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Maha Vikas Aghadi News: काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांना १५ जानेवारीपूर्वी  जागावाटपाची चर्चा पूर्ण करण्यास उत्सुक आहे, असे संकेत दिले आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल. काँग्रेस ४ जानेवारीनंतर इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांसोबत जागा वाटपावर औपचारिक संभाषण सुरू करेल. तत्पूर्वी त्यांच्या राज्यातील नेत्यांकडून त्या त्या राज्यातील परिस्थितीबद्दल अहवाल सादर होणार आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून, त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत असे तुम्हाला कुणी सांगितले? काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंचा चांगला संवाद आहे. त्यामुळे जागावाटपाच्या विषयात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. भविष्यात आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ. काँग्रेसचा जागावाटपासंदर्भातला विषय आम्ही दिल्लीत बसून सोडवू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

उद्या भाजपा सत्तेत नसेल, तर आपण कुठे असाल हाही विचार करून ठेवा

काँग्रेसचे अनेक लोक भाजपामध्ये येणार असल्याचे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी अनेक पक्ष बदलले. ते शिवसेनेत होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भाजपात आहेत. पक्षांतराची ज्यांना चाड नसते, असे लोक अशी वक्तव्य करत असतात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार? कोण जातेय, कोण राहतेय हे येणारा काळ ठरवेल. उद्या भाजपा सत्तेत नसेल, तर आपण कुठे असाल हाही विचार करून ठेवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून लवकरच त्यासंदर्भात माहिती दिली जाईल, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. यावर, सुप्रिया सुळेंनी जर सांगितले की महाविकास आघाडीत जागावाटपावर कोणतेही मतभेद नाहीत आणि लवकरच यासंदर्भात घोषणा होईल, तर मी त्याचे स्वागत करतो. आम्ही सगळे एक आहोत. एक-दोन जागांसाठी आम्ही आघाडीत तणाव निर्माण करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे