शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 10:52 IST

उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला

मुंबई - शरद पवारांनी जी भूमिका मांडली ती पहिल्यापासून आहे. त्यात नवीन काही नाही. संसदेचे अधिवेशनही चालले नाही. केवळ अदानी मुद्दा नव्हता तर महागाई, बेरोजगारीसारखे अनेक विषय होते. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाची भूमिका स्वतंत्र होती. परंतु ते दोन्ही पक्ष विरोधकांच्या आघाडीत तेव्हाही होते आणि आजही आहेत असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनीअदानींसंदर्भात वेगळी भूमिका मांडली असली तरी त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतीही फूट अथवा तडा जाणार नाही. अदानींना शरद पवारांनी क्लीनचीट दिली नाही. चौकशीचे पर्याय आहेत त्याबाबत मत व्यक्त केले. आम्ही सर्व जेपीसी चौकशीचा आग्रह धरतो. पण जेपीसीत चेअरमन, सदस्य सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यातून निष्पन्न काय होणार? त्यांना हवा तो रिपोर्ट देऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत न्यायालयीन चौकशी हा पर्याय पवारांनी सूचवला. अदानींबाबत वेगळे मत असू शकते. विरोधी पक्षातील एकजुटेला धक्का लागणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत देशातील गुन्हेगाराला ज्या मार्गाने शिक्षा मिळेल असे कुठलेही पर्याय चालू शकतात. परंतु विरोधी पक्ष अदानींबाबत जेपीसी चौकशीवर ठाम आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते हे त्यांचे मत आहे. हिंडेनबर्ग अहवालाने देशात आणि जगात खळबळ माजली. भाजपाने देशातील जनतेचा पैसा उद्योगपतीच्या खिशात घातला हे समोर आले. संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीच्या पाठिशी राहिले. अंबानी किंवा अन्य कुणीही असो उद्योग टिकायले हवेत. उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. 

काय म्हणाले होते शरद पवार?“कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संपूर्ण प्रक्रियेचं नुकसान होतं. हिंडेनबर्ग अहवालाला विरोधकांकडून गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. याची पार्श्वभूमी कोणालाही माहित नाही, ना आम्ही त्याचं नाव ऐकलंय, या प्रकरणी एका व्यावसायिक समूहाला लक्ष्य करण्यात आलं. परंतु जेपीसीनं हा मुद्दा सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंच सत्य सर्वोसमोर येईल. या प्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, त्याचं काही महत्त्व नसेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAdaniअदानी