शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानावरून ठाकरे गटानं जितेंद्र आव्हाडांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:50 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे स्थान, वेगळे महत्त्व आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्या परिषदेत NCP नेते जितेंद्र आव्हाडांनीछत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना अशाप्रकारे आव्हाडांनी विधान केले. त्यावरून शिवसेना ठाकरे गटानेही आव्हाडांना फटकारलं आहे. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केले त्यावर बिल्कुल सहमत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे स्थान, वेगळे महत्त्व आहे. अफझलखान होते, शाहिस्तेखान होते म्हणून शिवाजी महाराज होते असं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून त्यांचे नाव उरले अन्यथा कुठेही नाव उरले नसते असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला. त्याचसोबत सहकारी पक्ष असला म्हणून काय झाले. ज्याचे त्याचे विचार वेगळे असतात. शिवसेनेचा स्वतंत्र विचार आहे असं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. 

विधान मागे घेणार नाही - आव्हाड  माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. मी जे बोललो त्याचे संदर्भासहित हे स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले. तुम्ही बदनामी करा बहुजन महापुरुषांची, आम्ही देऊ उत्तर. बहुजन इतिहास का डोळ्यात सलतो..करारा जवाब मिलेगा असे म्हणत आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत मी माझ्या विधानावर ठाम आहे असल्याचं स्पष्ट केले आहे. 

रावण काढून श्रीराम समजावून सांगाजितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज