शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:16 IST

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. 

भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला तर आम्हाला वेगळ्या पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेले नाही. त्यांच्या लेखी पक्षविरोधी कारवाई आम्ही केली मग आम्हाला त्यांनी अपात्र का ठरवले नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला. जे काही नार्वेकर बोलले तो ड्राफ्ट लिहून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आहोतच. त्यांनी व्हीप बजावावा आम्ही तो व्हीप मान्य करणार नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. 

आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय

आमची मशाल आता सगळीकडे धगधगत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिले नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. या लोकांना काही अडचण होती, तर मविआचे सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवे होते. मंत्रीपद नाकारायला हवे होते. मंत्रिमंडळात यायचे नव्हते. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहिती आहे, या शब्दांत अनिल परब यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असे अनिल परब यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब