शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

" ठाकरे सरकार म्हणजे 'पलटूराम' सरकार; बदल्या करा अन् माल कमवा हेच त्यांचे धोरण .." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 18:15 IST

राज्य सरकार रोज नवी घोषणा करते आणि ती लगेच मागे घेते: देवेंद्र फडणवीस

ठळक मुद्देपदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी चिंचवड येथे मेळावा

पिंपरी: राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. पलटूराम सरकार आहे. वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे केली.

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी चिंचवड येथे मेळावा झाला. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, निरंजन डावखरे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''अनैसर्गिक सरकार निर्माण केले. त्याचे परिणाम आपण पाहत आहात.

फडणवीस म्हणाले, ''2002 चा अपवाद वगळता पुणे हा पदवीधर मतदार संघ भाजपचा गड होता. तो राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना, राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी याना नावे ठेवायचे. मात्र, पंतप्रधान सामान्य माणसांची यांची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारत सुकर जीवन केले. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तूमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप रहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले. दोन खोल्यासाठी २० हजार बिल आले होते. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे. जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हे राज्य सरकार रोज नवी घोषणा करीत आहे आणि मागे घेत आहे. पलटूराम सरकार आहे. '' ........ 

विकास बंद पडण्याचे काम फडणवीस म्हणाले, ''वर्षभरात सरकारने काय केले तर सुरू असणारे प्रकल्प आणि काम बंद पाडली. आणि बदल्या करा माल कमवा, हे धोरण स्वीकारले. बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांत असंतोष पसरत आहे. महाराष्ट्र असंतोष मतात परावर्तीत करायला हवा. विजेचा शॉक दिला त्यांना मतांचा शॉक द्यावा.'' अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण