जीएसटीविरोधात ठाकरे बंधू एकवटले

By Admin | Updated: August 28, 2016 19:02 IST2016-08-28T18:30:56+5:302016-08-28T19:02:10+5:30

जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होतो आहे.

Thackeray Brothers gathered against GST | जीएसटीविरोधात ठाकरे बंधू एकवटले

जीएसटीविरोधात ठाकरे बंधू एकवटले

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 28 - जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. मनसेचा जीएसटीला पाठिंबा, मात्र काही शंका आहेत. राज्य आणि मनपाचे अधिकार कायम राहावे, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. दहीहंडीसाठी कोर्टानं दिलेले निर्बंधांचं उल्लंघन केलेल्या मनसे कार्यकर्त्यांची आज राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन भेट घेतली आहे. गोविंदांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर याआधी उद्धव ठाकरेंनीही जीएसटीला विरोध केला आहे. 

यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयवर सडकून टीका केली आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, खटल्यांची मला सवय आहे. कोर्टानं मत मांडू नका, न्याय द्यावा असा टोलाही राज ठाकरेंनी कोर्टाला लगावला आहे. मुख्यमंत्री आता गुजरातीमधून टि्वट करत असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंवरही पलटवार केला आहे. जेलमध्ये गेल्यावर आयुष्य फळफळत हे नारायण राणेंकडूनच समजलं. नारायण राणेंनी दहीहंडीवर बोलू नये. त्यापेक्षा घरच्यांना थोडे सल्ले द्यावेत, असंही राज ठाकरे म्हणाले आहे. यावेळी नारायण राणेंच्या वृत्तपत्रावरही राज ठाकरेंनी टीका केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

दहीहंडी हा मराठी माणसातील एकी दाखवणारा सण
मुख्यमंत्री गुजरातीमध्ये आता टि्वट करतात
जीएसटीच्या आडून पालिकेची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न
मत मांडू नका, न्याय द्या- राज ठाकरेंचा कोर्टाला टोला
जेलमध्ये गेल्यावर आयुष्य फळफळत हे नारायण राणेंकडूनच अनेक तरुण शिकले आहेत
राणे सारख्या व्यक्तीने मला सल्ले देण्यापेक्षा स्वतः च्या घरी सल्ला द्यावा, त्याचा फायदा जास्त त्यांना होईल
नारायण राणेंनी दहीहंडीवर बोलू नये
मनुष्यवधाचा गुन्हा दहीहंडीवर कसा लागू शकतो? 
सर्व सणावर कोर्टाने आचारसंहिता आखू नये सरकारने ही नियमावली बनवावी, राज ठाकरे यांची मागणी
राज्य आणि मनपाचे अधिकार कायम राहावे
जीएसटी योग्य मात्र राज्यांना केंद्रशासित करण्याचा डाव
राज ठाकरेंनी केला दहीहंडीत कायदेभंग करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान
मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यायला आलोय, खटल्यांची मला सवय
0मनसेचा जीएसटीला पाठिंबा, मात्र काही शंका आहेत 

 

Web Title: Thackeray Brothers gathered against GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.