शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाकसोबतच्या क्रिकेटवरून ठाकरे-भाजपमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 07:31 IST

Uddhav Thackeray News: माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास तीव्र विरोध दर्शविला.

 मुंबई - माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी आशिया चषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास तीव्र विरोध दर्शविला. या टीकेला भाजप नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने दोघांत चांगलीच जुंपली.

शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाकरे म्हणाले की, कबुतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तिणीसाठी अक्षरश: हजारो लोक रस्त्यावर उतरतात. त्यातून भूतदया, माणुसकीची झलक दिसते. पहलगाममध्ये आपले नागरिक मारले गेले. जवान शहीद झाले. माता भगिनींचे सिंदूर पुसले. तरी पाकविरुद्ध क्रिकेट खेळण्याची भूमिका घेतली जाते, तेव्हा देशाच्या अस्मितेचा विचार का केला जात नाही? 

एकीकडे दहशतवादी देश म्हणून पाकविरुद्ध भूमिका घ्यायची व दुसरीकडे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचे ही विसंगती आहे. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, विनायक राऊत व आमदार महेश सावंत  उपस्थित होते.

सरकारी आदेशाची होळी करूशिक्षकांना शिक्षकेतर काम दिले जात असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना गहू-तांदूळ निवडण्याचे काम दिले जाते. नको ती कामे दिली जातात. पण, उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला नको ती कामे सांगितली, तर त्याचे आदेश घेऊन या आपण त्या आदेशाची होळी करून टाकू, कारण आपण वेडेवाकडे काम करणार नाही. आपण गुरुदेव म्हणतो, पण शिक्षक त्यांच्या घरातील गुरं नाहीत, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.

शेलार यांचे प्रत्युत्तरशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, की राऊत हे ट्रम्पना देखील पत्र पाठवू शकतात. मुळात फक्त पाकिस्तान विरुद्ध सामने खेळणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका कायम आहे. मात्र, आशिया चषक ही बहुदेशीय स्पर्धा आहे आणि त्यात खेळू नये, ही भूमिका भारत, भारतीय खेळाडू आणि क्रिकेटचे चाहते यांच्यासाठी जाचक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा