तज्ज्ञ डॉक्टरांची मनपा रुग्णालयांकडे पाठ
By Admin | Updated: May 8, 2014 02:25 IST2014-05-08T02:25:32+5:302014-05-08T02:25:32+5:30
फिजिशियन, सर्जन, अर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जन असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर भरतीची जाहिरात दिल्यानंतर त्यास प्रतिसाद मिळत नाही.

तज्ज्ञ डॉक्टरांची मनपा रुग्णालयांकडे पाठ
पिंपरी : फिजिशियन, सर्जन, अर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जन असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर भरतीची जाहिरात दिल्यानंतर त्यास प्रतिसाद मिळत नाही. महापालिका रुग्णालयांच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या रकमेचे मानधन मिळते. त्यामुळे ते खासगी रुग्णालयात नोकरी करण्यास प्राधान्य देतात. ही वस्तुस्थिती विशद करून महापालिकेच्या रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते आहे. ही बाब मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय यांनी निदर्शनास आणून दिली आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, अन्य कर्मचारी वर्ग याबाबतची माहिती देताना डॉ. रॉय म्हणाले, ‘‘खासगी रुग्णालयांमध्ये चार ते पाच तासाच्या ड्युटीसाठी डॉक्टरांना दीड ते दोन लाख रुपये मानधन मिळते. महापालिकेकडून मात्र ५५ते ६० हजार रुपयांचे मानधन मिळते. मानधन रकमेत एवढी मोठी तफावत असल्याने महापालिका रुग्णालयात काम करण्यास डॉक्टर तयार होत नाहीत. सध्या महापालिकेकडे तीन फिजिशियन आहेत. वायसीएम रुग्णालयासाठी सहा तसेच उर्वर्रीत सहा रुग्णालयांसाठी प्रत्येकी एक यानुसार फिजिशियनच्या १२ जागा रिक्त आहेत. तसेच रेडिओलॉजिस्ट, सर्जन, आॅर्थोपेडीक या जागा रिक्त आहेत. निवडणूक आचारसंहिता संपताच वैद्यकीय अधिकारी पदाची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तज्ज्ञ डॉक्टर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. वायसीएमसह चिंचवडचे तालेरा, भोसरी रुग्णालय, पिंपरीतील जिजामाता, सांगवी, आकुर्र्डी, यमुनानगर रुग्णालय तसेच थेरगावचे खिंवसरा पाटील रुग्णालय या सात रुग्णालयासह अन्य १६ बाह्यरुग्ण दवाखाने आहेत. रोज ८०० ते १२०० रुग्ण उपचारासाठी येतात. डॉक्टरांचे प्रमाण कमी आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये बाल, स्त्रीरोग, भूल तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ यांची कमतरता आहे. (प्रतिनिधी)
करारावरील डॉक्टरांचा आधार ४वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणार्यांना किमान एक वर्ष शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रूग्णालयांमध्ये काम करणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडून तसा करार लिहून घेतला जातो.असे बाँडवरील डॉक्टर वायसीएम आणि महापालिकेच्या अन्य रूग्णालयांना उपलब्ध होत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता काही अंशी भरून निघण्यास मदत होते.अशा डॉक्टरांच्या ७३ पदांना शासनाची मंजूरी आहे. परंतू महापालिकेकडे सद्या ५३ डॉक्टर उपलब्ध आहेत. ४शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याने रुग्णसेवेवर ताण वाढू लागला आहे. महापालिकेने वैद्यकीय अधिकारी पदासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी अर्ज मागविले होते. मनपाकडे केवळ तीनच फिजिशियन महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये केवळ तीनच फिजिशियन आणि अवघे दोन न्यूरो सर्जन आहेत. वायसीएममध्ये १, भोसरीत १ आणि तालेरात एक असे तीनच फिजिशियन आहेत. वायसीएम रूग्णालयाला ६ फिजिशियनची आवश्यकता आहे. वायसीएमला वैद्यकीय अधिकार्यांची तसेच परिचारिकांची कमतरता भासते आहे.
‘वॉक इन इन्टरव्ह्यू’
औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांत कामगारभरतीसाठी जसे वॉक इन इंटरव्हयू होते, त्याच धर्तीवर मानधन तत्वावर डॉक्टर भरतीसाठी पालिकेत दर सोमवारी वॉक इंटरव्ह्यू होतो. याच पद्धतीने सद्या परिचारिकांची भरती केली जाते. अशा पद्धतीने रूग्णालयीन कर्मचारी भरती प्रक्रिया कायम सुरू असते. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रस्ताव पडला मागे ४पालिकेच्या रूग्णालयांना शासनाकडून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत,या उद्देशाने वायसीएमला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विविध वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू केल्यास आवश्यकता भासणारे डॉक्टर उपलब्ध व्हावेत. यासाठी ११८ पदांच्या भरतीस राज्य शासनाने संमती दिली आहे. परंतू वैद्यकीय शाखेचे पदविका अभ्यासक्रम नसताना अपवादात्मक परिस्थितीत पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही.