- अविनाश कोळीसांगली - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील शिक्षकांची कोंडी झाली आहे. सक्तीची असलेली सीटीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारीस आहे. ८ फेब्रुवारीलाही काही शिक्षकांची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी पात्रता निश्चित केली. त्यानुसार ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांनादेखील दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावे लागेल. पात्रता पूर्ण न केल्यास सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पदोन्नतीही ‘टीईटी’ उत्तीर्ण असेल तरच दिली जाणार आहे. शिक्षकांनाही वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे.
ना जवळ केंद्र, ना केंद्रासाठी पसंतीशिक्षक पात्रता परीक्षा मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व सोलापूर अशा केंद्रांवरच होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना अर्ज भरताना कोणताही चॉइस दिला गेला नव्हता. जिथे क्रमांक येईल त्या केंद्रावर त्यांना परीक्षा द्यावी लागेल. दोन्ही दिवशी सकाळी ९ ते ११:३० व दुपारी २:३० ते ५ अशा वेळेत परीक्षा होत आहे. परीक्षा केंद्र २०० ते ४०० किलोमीटर लांब असल्याने एक दिवस अगोदर परीक्षेसाठी जावे लागणार आहे.
Web Summary : Maharashtra teachers are in a fix as the TET exam clashes with election duties. Mandatory for promotions and continued employment, teachers face logistical nightmares due to distant exam centers and inflexible scheduling.
Web Summary : महाराष्ट्र के शिक्षक टीईटी परीक्षा और चुनाव ड्यूटी के टकराव से परेशान हैं। पदोन्नति और नौकरी के लिए अनिवार्य, शिक्षकों को दूर के परीक्षा केंद्रों और समय सारणी के कारण मुश्किलों का सामना करना पड़ रहा है।