शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा- श्रीकांत शिंदे

By मुरलीधर भवार | Updated: May 31, 2025 17:19 IST

Srikant Shinde: खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा पाकिस्तानला इशारा

मुरलीधर भवार, कल्याण: पहलगाम येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने 'दशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता ' धोरण अवलंबिले आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सिएरा लिओन या देशाला २८ ते ३० मे २०२५ दरम्यान भेट दिली. या भेटीमागील उद्दिष्ट जागतिक स्तरावर दहशतवादाच्या गंभीर धोक्याविषयी जनजागृती करणे व आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील विविध उच्चपदस्थ व्यक्तींशी विस्तृत चर्चा केली. यात संसदाध्यक्ष, संसद सदस्य व परराष्ट्र विषय समिती, संरक्षण उपमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, कार्यवाह परराष्ट्र मंत्री तसेच सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती यांचा समावेश होता. भारताचा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता धोरण या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि दहशतवादविरोधी जागतिक ऐक्याची आवश्यकता ठळकपणे मांडण्यात आली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सिएरा लिओनच्या संसदेने तीव्र शब्दांत निषेध केला आणि हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती डॉ. मोहम्मद जुलडेह जल्लोह, यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतातील दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आणि भारतासोबत ऐक्य दर्शवले. संरक्षण उपमंत्री कर्नल (निवृत्त) मुआना ब्रिमा मासाकोयी आणि विरोधी पक्षाचे उपनेते डॅनियल ब्रिमा कोरोमा यांनीही दहशतवादाचा तीव्र निषेध करत भारताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला. 

मंत्री मासाकोयी यांनी अफ्रिकन देशांनीही त्वरित एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे नमूद केले. यावेळी खासदार शिंदे यांनी सिएरा लिओनमधील विविध परदेशी राजनयिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाईची गरज अधोरेखित केली. भारताविरुद्ध सीमापार दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या व प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील स्थानिक प्रसारमाध्यमे व भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि भारत व सिएरा लिओनमधील दृढ मैत्रीचे पुन्हा एकदा स्मरण करून दिले. या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर जागतिक मंचांवर दहशतवादाविरोधात समन्वित कारवाई करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनासह झाला.

या दौऱ्यादरम्यान खासदार शिंदे यांनी सिएरा लिओन येथील संसद अध्यक्ष यांच्यासमवेत इतर संसदीय सदस्यांसह झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत भारत आणि दहशतवाद याबाबत विविध महत्वाच्या विषयांना अगदी आक्रमक पद्धतीने हात घालून थेट पाकिस्तानवर सडकून टीका देखील केली. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा माणुसकीवर झालेला हल्ला असून पाकिस्तान या दहशवादाला खतपाणी घालत असल्याचे टीका देखील त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणTerror Attackदहशतवादी हल्ला