प्रधानमंत्री पीक विम्याला ३१ जुलैपर्यंत मुदत
By Admin | Updated: July 8, 2016 00:52 IST2016-07-08T00:52:29+5:302016-07-08T00:52:29+5:30
चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंद

प्रधानमंत्री पीक विम्याला ३१ जुलैपर्यंत मुदत
पुणे : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंद करून पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.
लहरी हवामान, अनपेक्षितपणे होणारा किड, रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे कोणत्याही प्रकारची निश्चिती नाही. यामुळेच शासनाने गत वर्षापासून ही पीक विमा योजना सुरू केली आहे. योजनेत पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, हंगामातील प्रतिकूल परस्थिती व स्थानिक नैसर्गिक आपत्ती याचा समावेश आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पिकाचे नावविमा शेतकऱ्यांनी
संरक्षित भरावयाची
रक्कमरक्कम
भात३९०००७८०
खरीप ज्वारी२४०००४८०
बाजरी२००००४००
नाचणी२००००४००
मका२५०००५००
तूर२८०००५३०
मूग१८०००३६०
उडीद१८०००३६०
भुईमूग३००००६००
कांदा५००००२५००