राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची 3क् जुलैर्पयत मुदत

By Admin | Updated: July 1, 2014 01:49 IST2014-07-01T01:49:08+5:302014-07-01T01:49:08+5:30

कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .

Term of National Agriculture Crop Insurance Scheme till July 3 | राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची 3क् जुलैर्पयत मुदत

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची 3क् जुलैर्पयत मुदत

>बाभळेश्वर : खरीप हंगाम 2क्14 साठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत 31 जुलै 2क्14 र्पयत शेतक:यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे .
राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2क्14 मध्ये पीक विमा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शेतक:यांसाठी लागू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैर्पयत विमा रक्कम भरण्यासाठी शेतक:यांना मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतक:यांना हवामानावर आधारित पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही, अशा सर्व शेतक:यांना आता राष्ट्रीय पीक विमा योजनेत 31 जुलैर्पयत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी या योजनेचा लाभ राज्यातील शेतक:यांना नैसर्गिक प्रसंगी मोठय़ा प्रमाणात मिळाला. खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठा परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे तृणधान्य, गळीत धान्य व नगदी पिकाच्या उत्पादनावर होणारा परिणाम वाचविण्यासाठी आणि शेतक:यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा आधार घेता येईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Term of National Agriculture Crop Insurance Scheme till July 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.