दहावीची फेरपरीक्षा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:21 IST2017-07-18T00:21:44+5:302017-07-18T00:21:44+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची फेरपरीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे.

दहावीची फेरपरीक्षा आजपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची फेरपरीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. यासाठी राज्यभरातून १ लाख १७ हजार ६८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही लेखी परीक्षा दि. २ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूर्वी आॅक्टोबरमध्ये परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जात होते. हे टाळण्यासाठी राज्य मंडळाकडून मागील तीन वर्षांपासून जुलैमध्येच फेरपरीक्षा घेतली जात आहे. दरम्यान, बारावीची फेरपरीक्षा दि. ११ जुलैपासून सुरू झाली असून दि. २८ जुलैपर्यंत चालणार आहे.