आजपासून दहावीची फेरपरीक्षा

By Admin | Updated: July 21, 2015 01:04 IST2015-07-21T01:04:16+5:302015-07-21T01:04:16+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून सुरू होणार आहे. मुंबई विभागातून

Tenth round review today | आजपासून दहावीची फेरपरीक्षा

आजपासून दहावीची फेरपरीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून सुरू होणार आहे. मुंबई विभागातून ३२ हजार ३२५ तर राज्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७९२ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.
दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून शालेय शिक्षण विभागाने प्रथमच जुलै महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आॅक्टोबरऐवजी जुलैमध्ये परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातच अकरावीला प्रवेश घेता येईल, असा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे मार्चमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची दुसरी संधी मिळाली आहे.
राज्यभरातील विविध केंद्रांवर २१ जुलै ते ५ आॅगस्टदरम्यान लेखी परीक्षा होणार आहे.फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात फेरपरीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला सप्टेंबरपासून सुरूवात करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

Web Title: Tenth round review today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.