तेरणा विद्यालय व्यवस्थापनाची मनमानी

By Admin | Updated: June 28, 2016 02:24 IST2016-06-28T02:24:22+5:302016-06-28T02:24:22+5:30

नेरुळमधील तेरणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने भरमसाट फीवाढ केली आहे.

Tenta school management arbitrariness | तेरणा विद्यालय व्यवस्थापनाची मनमानी

तेरणा विद्यालय व्यवस्थापनाची मनमानी


नवी मुंबई : नेरुळमधील तेरणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने भरमसाट फीवाढ केली आहे. शालेय वस्तूंसाठीचे शुल्क वाढविले आहे. इमारत दुरुस्तीचे कामही रखडल्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शासनाच्या सूचनेप्रमाणे शहरातील सर्व शाळा १५ जूनला सुरू झाल्या आहेत. परंतु नेरूळमधील तेरणा शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने २६ जूनपर्यंत शाळा बंद होती. व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वी पालकसभा घेवून पुढील शैक्षणिक वर्षात गणवेश, बॅग व इतर शैक्षणिक साहित्य शाळा देणार असून त्यासाठी २५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पालकांनी पैसे जमा केले परंतु गत आठवड्यात इ. निहाय १४०० चे २६०० रुपये जादा द्यावे लागणार असल्याचे सांगितले. याशिवाय अचानक फीवाढही केली. यामुळे पालकांमध्ये व्यवस्थापनामुळे स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुरू होत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. अचानक केलेल्या फीवाढीचा भुर्दंडही पडला आहे. नागरिकांमधील नाराजी वाढल्याने २७ जूनला शाळा सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज पाटील, गिरीष म्हात्रे, महादेव पवार यांनी व्यवस्थापनाची भेट घेवून फीवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक साहित्याचे वाढविलेले दर कमी करण्याचीही मागणी केली आहे. व्यवस्थापनाने याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. व्यवस्थापन पालकांवरील भुर्दंड कमी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>राष्ट्रवादीने घेतली धाव
तेरणा व्यवस्थापनाने केलेल्या फीवाढीचा व गणवेशाचे दर वाढविण्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. नगरसेवक सूरज पाटील यांनी फीवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. व्यवस्थापनाने आठ दिवसांमध्ये फीवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.
>शिवसेना देणार
आज निवेदन
फीवाढीचा विरोध करण्यासाठी शिवसेना मंगळवारी तेरणा विद्यालयावर धडक देणार आहे. व्यवस्थापनाला जाब विचारण्यात येणार आहे. फीवाढ थांबविली नाही तर तीव्र आंदोलन सुरू केले जाणार आहे.

Web Title: Tenta school management arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.