धरणगावात दोन गटात तणाव

By Admin | Updated: June 29, 2015 02:04 IST2015-06-29T02:04:11+5:302015-06-29T02:04:11+5:30

अधिक मासानिमित्त पहाटे निघालेल्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी लावलेल्या पणत्यांना काहींनी लाथा मारून त्या उधळल्याने शहरात दोन गटांत वाद झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Tension in two groups in Dharagana | धरणगावात दोन गटात तणाव

धरणगावात दोन गटात तणाव


धरणगाव (जि. जळगाव) : अधिक मासानिमित्त पहाटे निघालेल्या दिंडीचे स्वागत करण्यासाठी लावलेल्या पणत्यांना काहींनी लाथा मारून त्या उधळल्याने शहरात दोन गटांत वाद झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलीस व राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर बसस्टँड परिसरात संतप्त जमावाने विविध वस्तू आणि फळांची विक्री करणाऱ्यांच्या हातगाड्या उलटविल्याने गावात दंगलीची अफवा पसरली होती. दोन्ही गटांनी परस्पराविरोधी फिर्यादी दिल्याने गुन्हे दाखल झाले आहेत.
रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दिंडीच्या स्वागतासाठी पाताळनगरी भागात गृहिणींनी रांगोळ्या काढून पणत्या लावल्या होत्या. काही समाजकंटकांनी पणत्या लाथाडल्या.यामुळे काही वेळातच तणाव निर्माण झाला. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसस्टँड परिसरात संतप्त जमावाने फळविक्री करणाऱ्यांच्या हातगाड्या उलथवून टाकल्या. (वार्ताहर)

Web Title: Tension in two groups in Dharagana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.