मालेगावमध्ये तणाव, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जमावाकडून दगडफेक
By Admin | Updated: April 8, 2016 14:40 IST2016-04-08T14:40:29+5:302016-04-08T14:40:29+5:30
आयेशानगरमधील आक्सा कॉलनीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या रागातून जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली आहे

मालेगावमध्ये तणाव, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी जमावाकडून दगडफेक
>ऑनलाइन लोकमत -
मालेगाव (नाशिक) - आयेशानगरमधील आक्सा कॉलनीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या रागातून जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. मालेगावमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत त्यांचीही तोडफोड केली. जमावाने काही वाहनेही जाळली आहेत. परिसरात तणावाचे वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.