शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महाविकास आघाडीत खळबळ! उमेदवारीपासून वंचित नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:59 IST

Vishal Patil Sangli Latest News प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना राज्यात अस्तित्व ठेवायचेच नाहीय असे वागत असल्याचा आरोप केला आहे.

सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा खेळ होणार आहे. आज स्थानिक काँग्रेस नेत्यांची बैठक होत आहे. अशातच सकाळीच नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत पाटलांच्या उमेदवारीबाबत घोषणा होणार आहे. अशातच वंचितनेही सांगलीत उमेदवारी कोणाला दिली नव्हती. यामुळे वंचितच्या पाठिंब्याने किंवा वंचितच्या तिकीटावर विशाल पाटील निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्राबल्य असलेला सांगली मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. ठाकरेंनी उमेदवारीच्या वादावर आधीच उमेदवार जाहीर करून टाकल्याने काँग्रेसची पुरती कोंडी झाली होती. ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर विशाल पाटील हे तिथून इच्छुक आहेत. गेल्या ४० वर्षांपासून विशाल पाटलांचे घराणे या मतदारसंघात सत्ता राखून आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना राज्यात अस्तित्व ठेवायचेच नाहीय असे वागत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सांगलीत शिवसेनेची ताकद नसूनही त्यांना मतदारसंघ दिला गेल्याचे म्हटले आहे.  पाटील आज सकाळीच मला भेटले. अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच मी त्यांना कोणता सल्लाही दिलेला नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. वरिष्ठ नेतेही काही बोलायला तयार नाहीत. पटोले यांनी मी नाराज आहे परंतु हायकमांडचा आदेश मानावा लागेल असे म्हटले आहे. यामुळे काही केल्या स्थानिक नेतृत्व चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला जाण्याची शक्यता कमीच आहे. यातच विशाल पाटलांनी वेगळी भुमिका घेतली आणि उमेदवारी दाखल केली तर काँग्रेसची ताकद त्यांच्या मागे राहणार आहे. यामुळे ठाकरे-राऊतांना सांगलीचा अट्टाहास अन्य ठिकाणी देखील महागात पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरvishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४