शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना डच्चू मिळणार? कोणाला नाकारायचे, तिन्ही पक्षांसमोर मोठा पेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 08:07 IST

Devendra Fadnvis Cabinet Expansion: प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या-त्या पक्षाचे हेविवेट नेते होते. त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची, हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर आहे. भाजपच नाही तर अन्य दोन पक्षांमधील काही दिग्गजांना धक्का दिला जावू शकतो.

प्रत्येकच पक्षात इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. शिंदे सरकारमध्ये २९ कॅबिनेट मंत्री होते आणि ते त्या-त्या पक्षाचे हेविवेट नेते होते. त्या सगळ्यांनाच संधी दिली जाणार नाही. प्रत्येक पक्षातील तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असे मानले जात आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षांच्या १० ते १२ जणांना डच्चू दिला जावू शकतो. जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच म्हटले आहे. 

कामगिरी चांगली असली तरी विभागीय संतुलन साधताना वेगळा निर्णय घेतला जावू शकतो असे संकेतही त्यांनी दिले होते. याचा अर्थ असाही लावला जात आहे की एखाद्या मंत्र्यांची कामगिरी चांगली असेल तरी विभागीय, सामाजिक संतुलन साधण्यास त्यांना वगळले जावू शकते.

विभागीय संतुलन, मराठा, बहुजन, मागासवर्गीयांना संधी, महायुतीला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य हे विस्तारासाठीचे महत्त्वाचे निकष असतील. फडणवीस हे अत्यंत सक्षम असे मुख्यमंत्री मानले जातात. तशीच आपली टीमही असावी असा त्यांचा प्रयत्न असेल. २०१४ मध्ये मंत्रिपदे देताना सक्षमता हा फारसा निकष नव्हता. यावेळी तो महत्त्वाचा निकष असेल असे मानले जाते.

प्रबळ दावेदारांची संख्या मोठीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर नवीन अध्यक्षपद कोणाला हा प्रश्न असेल. मंत्रिपदाची संधी देता आली नाही अशा पण फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले जावू शकते. विधानसभेचे अध्यक्षपद राहुल नार्वेकर यांना दिल्याने आपल्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यासाठी विधानसभाध्यक्ष करतात की काय अशी धाकधूक लागून असलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांना दिलासा मिळाला आहे. किमान १२ जिल्हे असे आहेत की जिथे महायुतीतीचे तीन ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठीचे दावेदार आहेत. अशावेळी त्यातून एकाला संधी देताना कसरत होणार आहे.तीनपैकी दोघांना किंवा किमान एकाला तरी संधी नाकारली जाईल.गृह किंवा नगरविकास अशी दोन्ही खाती शिंदेसेनेला दिली जाणार नाहीत अशी चर्चा आता जोरात आहे. त्यांना महसूल खाते दिले जावू शकते. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते. 

फडणवीस आज दिल्लीत!भाजप मंत्र्यांच्या यादीला पक्ष नेतृत्वाची मंजुरी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली

जास्तीत जास्त मंत्री असतील?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सचिवांची बैठक सोमवारी घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि गतिशीलता या आधारेच आपले सरकार चालेल असे ते म्हणाले. सचिवांकडून अशा कारभाराची अपेक्षा करताना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात या तीन निकषांना अनुरुप असेच जास्तीतजास्त मंत्री असतील आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्यांना घेतले जाणार नाही अशी चर्चा कालपासून जोरात आहे. फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची यादी बर्यापैकी अंतिम केली असल्याचे समजते.

२० दावेदार

शिंदेसेनेला १२ मंत्रिपदे दिली जातील असे समजते. गेल्यावेळी मंत्री असलेले आणि मंत्रिपदाची संधी न मिळालेले असे किमान २० जण प्रबळ दावेदार आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४