वाढदिवसाचा फलक फाडल्याने तणाव
By Admin | Updated: September 7, 2015 01:28 IST2015-09-07T01:28:37+5:302015-09-07T01:28:37+5:30
क्रशर चौकात पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक (फ्लेक्स) फाडल्याच्या संशयावरून शुक्रवारी मध्यरात्री नगरसेवक व जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकत्र्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.

वाढदिवसाचा फलक फाडल्याने तणाव
कोल्हापूर : क्रशर चौकात पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक (फ्लेक्स) फाडल्याच्या संशयावरून शुक्रवारी मध्यरात्री नगरसेवक व जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकत्र्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी कार्यकत्र्यांनी एकमेकांस शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने गोंधळ उडाला. या प्रकाराने मात्र शनिवारी दिवसभर परिसरात तणावपूर्ण वातावरण बनल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मिहापालिका निवडणुकीच्या पाश्र्?वभूमीवर इच्छुक उमेदवार वाढदिवस मोठ?ा धामधुमीत साजरा करीत आहेत. त्यासाठी शहरात किंवा अन्यत्र वाढदिवस शुभ्
ोच्छांचे डिजिट ा फलक लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. आज, रविवारी संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेवकाचा वाढदिवस आहे. त्यासाठी त्यांचे शहरात डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री क्रशर चौकात दोघांचे कार्यकर्ते डिजिटल फलक लावण्यासाठी आले. या ठिकाणी जागेच्या वादातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी कार्यकत्र्यांत एकमेकांस बघून घेण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करीत धक्काबुक्की झाल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही कार्यकत्र्यांना समज देऊन वाद मिटविण्यात आला. दोघांचेही फलक या ठिकाणी लावण्यात आले. त्यानंतर पोलीस निघून गेले. त्यानंतर काही क्षणांतच जिल्हाध्यक्षाचा डिजिटल फलक फाडल्याचे कार्यकत्र्यांना दिसले. त्यांनी या प्रकाराची माहिती जिल्हाध्यक्षांना दिली. ते काही कार्यकत्र्यांसह चौकात आल्याने पुन्हा वातावरण तणावग्रस्त बनले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकत्र्यांनी नगरसेवकासह त्यांच्या कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना आग्रह धरला. (िप्रतिनिधी) फलक फाडल्यावरून दोन गटांत किरकोळ वादावादी झाली होती; परंतु त्यांनी आपापसांत वाद मिटविल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.अिनिल देशमुख, पोलीस निरीक्षक (जुना राजवाडा)