तासगाव भाजपात बंडखोरी!

By Admin | Updated: March 25, 2015 02:13 IST2015-03-25T02:13:59+5:302015-03-25T02:13:59+5:30

भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांचे समर्थक स्वप्निल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

Tensgaon BJP rebellion! | तासगाव भाजपात बंडखोरी!

तासगाव भाजपात बंडखोरी!

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला असला, तरी भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांचे समर्थक स्वप्निल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकविले आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीने सुमनतार्इंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याचदिवशी सर्वच पक्षांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे निवडणूक लढविण्याबाबत आग्रही असल्यामुळे भाजपचा निर्णय उशिरा झाला. भाजपनेही सुमनतार्इंना पाठिंबा दिला. त्यानंतरही घोरपडे समर्थक आक्रमक होते.
२२ मार्चला झालेल्या एका बैठकीत घोरपडे यांनी स्वप्निल पाटील यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले होते. त्यानुसार मंगळवारी त्यांचे समर्थक व भाजप कार्यकर्ते स्वप्निल पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने पोटनिवडणुकीत बंडखोरीचा झेंडा फडकला आहे. (वार्ताहर)

Web Title: Tensgaon BJP rebellion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.