उद्योगांकरिता दहा दिवसांत जमीन देणार
By Admin | Updated: November 9, 2014 01:35 IST2014-11-09T01:35:41+5:302014-11-09T01:35:41+5:30
केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या अभियानात अग्रेसर राहण्याकरिता महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणा:या युरोपियन कंपन्यांना अवघ्या 10 दिवसांत जमीन देण्यात येईल,
उद्योगांकरिता दहा दिवसांत जमीन देणार
मुंबई : केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या अभियानात अग्रेसर राहण्याकरिता महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणा:या युरोपियन कंपन्यांना अवघ्या 10 दिवसांत जमीन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपियन समूहातील देशांच्या महावाणिज्यदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिली.
इटलीचे महावाणिज्यदूत युगो सिर्यालातानी, पोलंडचे महावाणिज्यदूत लेस्ङोक ब्रेंडा, ब्रिटनचे कुमार अय्यर, स्वीडनच्या फ्रेडरिका ओर्नब्रांट, स्पेनचे एदुआदरे दि केसादा, हंगेरीचे नॉरबर्ट रेविबेरी, जर्मनीचे मायकेल सिबर्ट, बेल्जियमचे कार्ल व्हान डेन बोशे, नेदरलंडचे जिऑफ्री लिवेन, फ्रान्सचे धर्मा गोपालकृष्णन यांच्यासोबत महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली.
फडणवीस म्हणाले की, उद्योग सुरू करण्याकरिता लागणा:या परवानग्यांची संख्या कमी करण्यावर सरकारचा भर असून, परवानग्या मिळवण्याकरिता एका ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येईल. त्यामुळे गुंतवणूकदारांना अल्पावधीत परवानग्या मिळतील. उद्योगांना 24 तास वीजपुरवठा करणारे महाराष्ट्र हे देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्राला वीजनिर्मिती करण्याकरिता जवळच्या कोळसा खाणींमधून कोळसा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. मुंबई महानगर क्षेत्रतील घनकच:यापासून वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प उभारण्याकरिता युरोपियन कंपन्यांना त्यांनी आवाहन केले. खा:या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर करण्याचे प्रकल्प सुरू करण्याची संधी असल्याचे ते
म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)