अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: January 18, 2017 21:49 IST2017-01-18T21:49:12+5:302017-01-18T21:49:12+5:30
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणाला विशेष न्यायाधीश एस़ जे़ काळे यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणा-या तरुणाला विशेष न्यायाधीश एस. जे.काळे यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़.
संजयकुमार वेलुजी डाबी (वय २२, रा़ पांडवनगर, मुळ म्हैसाळा, गुजरात) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ ही घटना ९ मे २०१३ रोजी पांडवनगर येथे घडली होती़ संजयकुमार डाबी याने या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला़ त्यातून ही मुली गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या खटल्यात विशेष सरकारी वकील हिरा बारी यांनी चार साक्षीदार तपासले़ सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश एस़.जे़. काळे यांनी संजयकुमार डाबी याला बलात्कार केल्याबद्दल आणि बाल लैगिक अत्याचार विरुद्ध मुलांच्या संरक्षणाच्या कायद्याखाली प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.