लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: July 16, 2014 03:16 IST2014-07-16T03:16:37+5:302014-07-16T03:16:37+5:30
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अजित काळोखे (२४)यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे

लैंगिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अजित काळोखे (२४)यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. कल्याण-बदलापूर मार्गावरील खोणी गावात १५ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती. अजितने गावातील एका ९ वर्षीय मुलीला शेतात बक-या घुसल्याचे दाखवितो, असे सांगत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अजितला तात्काळ अटक केली होती.
या प्रकरणाचा खटला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने चौघांची साक्ष तपासण्यात आली. जिल्हा न्यायाधीश राजेश्वरी बाप-सरकार यांच्या न्यायालयात नुकताच याचा निकाल दिला. (प्रतिनिधी)