शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

संजय राऊत यांची दहा तास ईडी चौकशी; तपास अधिकाऱ्यांना दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:26 IST

ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची शुक्रवारी ईडीने दहा तास चौकशी केली. राऊत दुपारी १२ वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि रात्री दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासात १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा तसेच मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. संजय राऊत चौकशीसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘कर नाही त्याला डर कशाचा’, असे म्हणत संजय राऊत कार्यालयात शिरले. ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांच्या वकिलाने ईडी कार्यालय गाठत ज्या मुद्यांची चौकशी करायची आहे, त्याकरिता लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळत दुसरे समन्स जारी करत राऊत यांना शुक्रवारी, १ जुलै रोजी हजर होण्यास सांगितले. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामधे १०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत सन २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान यांच्या विरोधातही तक्रार म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली होती. नंतर या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे ईडीने हाती घेतली. या प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे. या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच रायगड जिल्ह्यातील किहिम गावातील ८ भूखंडांची ईडीने एप्रिल महिन्यात तात्पुरती जप्ती केलेली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे जे प्रश्न विचारले त्याची मी सविस्तर उत्तरे दिली आहेत. तपास यंत्रणेशी पूर्णपणे सहकार्य केलेले आहे. गरज भासली तर मी पुन्हा येईन. - संजय राऊत, शिवसेना नेते

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयShiv Senaशिवसेना