कोकण रेल्वेवर दुरांतोचे १० डबे घसरले, वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: May 3, 2015 12:30 IST2015-05-03T09:46:26+5:302015-05-03T12:30:43+5:30

कोकण रेल्वेवर बालीजवळ लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

Ten coaches of Duronto dropped on Konkan Railway, traffic disrupted | कोकण रेल्वेवर दुरांतोचे १० डबे घसरले, वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेवर दुरांतोचे १० डबे घसरले, वाहतूक विस्कळीत

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी,दि. ३ - कोकण रेल्वेवर बालीजवळ लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुट्टीत कोकणात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. 

रविवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बालीजवळ एलटीटी - एर्नाकुलम एक्सप्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या मार्गावर धावणा-या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक फिसकटले आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Web Title: Ten coaches of Duronto dropped on Konkan Railway, traffic disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.