जालन्यात विहिरीमध्ये दहा मतपेटय़ा सापडल्या!
By Admin | Updated: November 9, 2014 02:10 IST2014-11-09T02:10:12+5:302014-11-09T02:10:12+5:30
शहरातील जिल्हा परिषद वसाहतीलगत असलेल्या गायरान जमिनीतील विहिरीत मतदानासाठी वापरण्यात येणा:या टीनपत्रच्या दहा मतपेटय़ा सापडल्या आहेत.

जालन्यात विहिरीमध्ये दहा मतपेटय़ा सापडल्या!
जालना : शहरातील जिल्हा परिषद वसाहतीलगत असलेल्या गायरान जमिनीतील विहिरीत मतदानासाठी वापरण्यात येणा:या टीनपत्रच्या दहा मतपेटय़ा सापडल्या आहेत. हा प्रकार शनिवार दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
विहिरीलगतच्या रमाबाईनगर झोपडपट्टीत राहणारे काही मुले या विहिरीत गेल्या काही दिवसांपासून पोहत आहेत. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला पाण्यात काहीतरी असल्याची जाणीव झाली. शुक्रवारी दुस:या दिवशीही त्यांनी नेमकी कोणती वस्तू आहे, हे पाण्यासाठी हे शाळकरी बालक पुन्हा विहिरीजवळ आले. त्यात 2क् ते 25 च्या संख्येत चौकोनी डबे असल्याचा भास झाला. त्यांनी हा प्रकार भारिप-बहुजन महासंघाचे विजय केळगावकर यांना सांगितला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करुन पेटय़ा काढण्यात आल्या़ (प्रतिनिधी)
च्सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीमरोट यांनी सांगितले, पत्रच्या पेटय़ा असून कोणीतरी चोरून आणल्या असाव्यात. मात्र भंगार विक्रेत्याने त्या खरेदी केल्या नसतील. त्यामुळे या पडक्या विहिरीत टाकून दिल्या असाव्यात.