शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद

By appasaheb.patil | Updated: August 9, 2019 11:57 IST

महावितरण : पुरामुळे नादुरुस्त वीज मीटर स्वखर्चाने बदलणार

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झालाधोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला

सोलापूर : ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत, अशा वीज ग्राहकांचे वीज मीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला असून, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १९३६ असे एकूण १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने कृषी पंपधारकांसह सुमारे २१ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे. पुराच्या पाण्याचा धोका निवळताच या रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीज मीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूरस्थिती निवळताच करण्यात येईल. पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सुरक्षेसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, पाणी कमी झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन