टेम्पोच्या धडकेत महिला ठार

By Admin | Updated: October 8, 2016 01:03 IST2016-10-08T01:03:30+5:302016-10-08T01:03:30+5:30

येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावर सहारा कॉलनीजवळ रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.

Tempo shocks women | टेम्पोच्या धडकेत महिला ठार

टेम्पोच्या धडकेत महिला ठार


कामशेत : येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावर सहारा कॉलनीजवळ रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.  कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६) पांडुरंग लक्ष्मण वाघमारे (वय ४५) व त्यांची पत्नी रखमाबाई पांडुरंग वाघमारे (वय ४३, रा. सांगिसे, ता. मावळ) हे आदिवासी दाम्पत्य खेकडे विकण्यासाठी महामार्गापलीकडील गणेशवाडी येथे गेले होते. दुपारी एकच्या सुमारास खेकडे विकून परतत असताना मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोची (एमएच ०४ जीएफ ४५७२) धडक बसून रखमाबाई जखमी झाल्या. दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालकास ताब्यात घेतले असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. व्ही. काकडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Tempo shocks women