टेम्पो ओढ्यात कोसळून ९ ठार

By Admin | Updated: July 4, 2016 04:27 IST2016-07-04T04:27:25+5:302016-07-04T04:27:25+5:30

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथे भरधाव पिकअप टेम्पो ओढ्यावरून पंचवीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच महिलांसह नऊ ठार

Tempo killed 9 dead | टेम्पो ओढ्यात कोसळून ९ ठार

टेम्पो ओढ्यात कोसळून ९ ठार


कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथे भरधाव पिकअप टेम्पो ओढ्यावरून पंचवीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच महिलांसह नऊ ठार व २४ जण गंभीर जखमी झाले. नातेवाइकाच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना ही दुर्घटना घडली.
कोंडिबा पांडुरंग पोवार (५५), विलास शंकर कोपार्डे (६०), पुतळाबाई बाळू पोवार (५५), रत्नाबाई रंगराव पोवार (६०), कोंडिबा पांडू चौगुले (५५), नामदेव बापू पोवार (५८), गुलशन लालसो पाटील (७०), छाया आनंदा कोपार्डे (५५, सर्व रा. मादळे, ता. करवीर), सुवर्णा दिनकर माजगावकर (३५, रा. पुलाची शिरोली) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) उपचार सुरू आहेत.
इचलकरंजीतील बंडगर माळ येथील नातेवाइकाचे निधन झाल्याने रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मादळे येथील २७ महिला-पुरुष पिकअप टेम्पोमधून रविवारी सकाळी गेले होते. दुपारी घरी परत येताना टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने गाडी हेलकावे खात होती. भरधाव टेम्पो कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले फाटा येथे आल्यावर चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याकडेच्या असलेल्या पूलाच्या कठड्याला धडकून पंचवीस फूट खाली ओढ्यात कोसळला.
टेम्पोखाली सापडून चौघे जण जागीच ठार झाले; तर काहीजण अडकून पडले तसेच बाजूला फेकले गेले. काहीजण डोक्याला गंभीर दुखापत होऊन बेशुद्ध पडले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णवाहिकेसह मिळेल त्या वाहनांतून ‘सीपीआर’मध्ये पाठविले. (प्रतिनिधी)

Web Title: Tempo killed 9 dead