वारक-यांच्या टेम्पोला अपघात, 43 जण जखमी
By Admin | Updated: June 17, 2017 21:23 IST2017-06-17T21:23:08+5:302017-06-17T21:23:08+5:30
भंडारा डोंगरावर वारक-यांच्या टेम्पोला झालेल्या अपघातात 43 जण जखमी झाले आहेत.

वारक-यांच्या टेम्पोला अपघात, 43 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचडव, दि. 17 - भंडारा डोंगरावर वारक-यांच्या टेम्पोला झालेल्या अपघातात 43 जण जखमी झाले आहेत. दुपारी 2 च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेले सर्व बीड जिल्ह्यातील आहेत.
काही वारकरी देहूतून भंडारा डोंगरावर विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी टेम्पोने गेले होते. दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. डोंगराच्या पायथ्यापाशी येताच टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. यामध्ये 43 भाविक जखमी झाले.
त्यात 23 महिला, 16 पुरुष व 4 मुले जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले .