शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तापमानाचा पारा पस्तीशी पार : उन्हाच्या झळा वाढल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 14:44 IST

मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर, ब्रम्हपुरी, सोलापूरचे तापमान चाळीशीच्या घरातराज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्याचा पारा छत्तीशीच्या जवळपास 

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, विदर्भ वगळता राज्यात हीच स्थिती राहील असा अंदाज आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा पस्तीशीपार गेला आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरी आणि सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीशीच्या घरात होते. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वरचा (३२.७ अंश सेल्सिअस) अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेला आहे. तसेच किमान तापमान देखील १५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३९.१ आणि किमान तापमानाचा पारा २१.६ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने, येथील उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल ब्रम्हपुरी येथे ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले.   मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, परभणी आणि नांदेडचा कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३९ दरम्यान होता. तर, औरंगाबादला ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात बुलडाणा (३३.५ अंश सेल्सिअस) वगळता उर्वरीत जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या घरात होता. विदर्भ आणि मध्यप्रदेशचा दक्षिण भाग, तसेच मध्य महाराष्ट्रात वाºयाची चक्राकार स्थिती झाली असून, मराठवाडा आणि कर्नाटकच्या उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदभार्तील काही ठिकाणी येत्या १९ मार्च पर्यंत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. तर, रविवारी (दि. १७) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल असा अंदाज वेधशाळेने वर्र्तविला आहे. --पुण्याचा पारा छत्तीशीच्या जवळपास पुण्यामध्ये शुक्रवारी कमाल तापमान ३६ आणि किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. लोहगावचे कमाल तापमान ३६.४ आणि किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस होते. बुधवारचा (दि. २०) अपवाद वगळता पुढील पाच दिवस शहरातील वातावरण कोरडे राहील. तसेच, कमाल तापमानाचा पारा देखील ३५ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. -प्रमुख शहरांत गेल्या २४ तासांत नोंदविलेले कमाल / किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुढीलप्रमाणे: मुंबई ३२.४/२१.५, सांताक्रूझ ३६.६/१९, अलिबाग ३१.५/१९.५, रत्नागिरी ३३.५/२०.३, पुणे ३६/१५.३, अहमदनगर ३८.६/१७.१, जळगाव ३६/१७, कोल्हापूर ३६.७/२१.४, महाबळेश्वर ३२.७/१८.४, मालेगाव ३५.२/१८, नाशिक ३३.७/१५.२, सांगली ३८/१८.२, सातारा ३६.१/१७.६, सोलापूर ३९.१/२१.६, उस्मानाबाद ३७.७/१९.७, औरंगाबाद ३५.२/२०.२, परभणी ३९/२०.५, नांदेड ३८/२०, बीड ३७.५/१८.६, अकोला ३७.७/२१.४, अमरावती ३८.८/१९.२, बुलडाणा ३३.५/२०.८, ब्रम्हपुरी ३९.४/२१.५, चंद्रपूर ३९.६/२३.८, गोंदिया ३५.६/१७.७, नागपूर ३६.७/१९.८, वाशिम ३७/२०.४, वर्धा ३७.२/२२.८, यवतमाळ ३८.५/२०.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमान