शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:56 IST

Maharashtra Heat Wave: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे/नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, उन्हाचा पाराही कमालीचा वाढला आहे. राज्यभरात कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मुंबईत उकाडा कायम आहे. 

रविवारी राज्यात सोलापूर आणि अकोल्यात उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारपासून विदर्भ, मराठवाड्यातील उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (यलो अलर्ट) इशाराही हवामान विभागाने दिला. दरम्यान, देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे. 

लोकसभा निवडणुकीचे अद्याप पाच टप्पे बाकी असताना वाढत्या उष्णतेचा परिणाम त्यावरही दिसत आहे. मे महिन्यात देशातील १५ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढत असल्याचा इशारा आयएमडीचे महासंचालक डॉ.एम. महापात्रा यांनी दिला आहे.

विदर्भासाठी मे 'ताप'दायकnमे महिन्याचा पहिला आठवडा विदर्भवासीयांसाठी अत्यंत ‘ताप’दायक ठरला आहे. एप्रिलमध्ये काहीसा दिलासा देणारा सूर्य मे मध्ये आग ओकत आहे. सर्वाधिक ४४.४ अंशांची नोंद झालेल्या अकोल्यानंतर चंद्रपूर, वर्धा शहरातही पारा ४४ अंशांवर गेला. nयावर्षी नागपूरचा पारा पहिल्यांदा ४३ अंशांवर पोहोचला आहे. नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असून रविवारी अक्षरश: अंगाची होरपळ होत असल्याचा अनुभव लोकांना आला.

पुढील पाच दिवस तापणारहवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊन असेच वाढत राहिल्यास तापमान त्यापुढेही जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उष्माघाताने  शेतकऱ्याचा मृत्यूपारोळा (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने रविवारी एका शेतकऱ्याचा मृत्यू घेतला. अर्जुन भगवान पाटील (६८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अर्जुन हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. बांधावर काम करताना चक्कर येऊन ते कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

राज्यात सोमवारपासून विदर्भातील ११ जिल्ह्यांत तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसह ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पारा वाढणार आहे.     - माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :Heat Strokeउष्माघात