तहसीलदारावर हल्ला; पाचजणांना अटक
By Admin | Updated: December 2, 2014 00:13 IST2014-12-01T23:38:37+5:302014-12-02T00:13:31+5:30
नागनूरला प्रकार : माफियांवर कारवाई

तहसीलदारावर हल्ला; पाचजणांना अटक
अथणी : नागनूर (ता. अथणी) येथे नोव्हेंबर २८ रोजी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकण्यास गेलेल्या तहसीलदार एस. एस. पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला. याप्रकरणी पाचजणांना अटक व दहाजण फरारी आहेत.
अथणी तालुक्यात वाळू माफियांची गुंडगिरी सुरू आहे. यांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाळू माफियांची साथ आहे. आतापर्यंत अटक केलेल्यात बसगोंडा पाटील, संजय बडगेर, अशोक कुंभार, सिकंदर मुल्ला, गणपती बडगेर यांचा समावेश आहे. वाळू माफियांवर कडक कारवाई केल्यास सत्य उजेडात येईल. एवढी कारवाई करूनसुध्दा शिरूर, खोतवाडी येथे वाळू उपसा सुरूच आहे.
दोन महिन्यांपूर्वी महसूल अधिकाऱ्यांवर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. अशा घटना घडत असल्याने अधिकारी थंड आहेत. धडक कारवाई केली नाही. अशामुळे सर्वसामान्य व्यक्तीस वेठीस धरल्यासारखे होत आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)