धनगर आरक्षणासाठी ‘टीज’चा अहवाल लवकरच

By Admin | Updated: May 30, 2016 04:52 IST2016-05-30T04:52:31+5:302016-05-30T04:52:31+5:30

धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यासासाठी नेमलेल्या यापूर्वीच्या टीआरटीच्या अहवालामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते.

'Tees' report for Dhangar reservation soon | धनगर आरक्षणासाठी ‘टीज’चा अहवाल लवकरच

धनगर आरक्षणासाठी ‘टीज’चा अहवाल लवकरच


पुणे : धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यासासाठी नेमलेल्या यापूर्वीच्या टीआरटीच्या अहवालामध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या ‘टीज’ या संस्थेमार्फत अभ्यास गट नेमण्यात आला असून त्यांचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्याची माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तसेच आरक्षण देण्यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ‘टीज’ला निर्देश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुस्लीम आणि मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयामध्ये टिकले नाही, तशी गत धनगर समाजाच्या आरक्षणाची होऊ नये, याकरिता काळजीपूर्वक हा अहवाल तयार केला जात असून त्यामुळे थोडा उशीर लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अहिल्यादेवी होळकर यांची २९१ वी जयंती जन्मगावी चौंडी येथे साजरी करण्यात येणार असून शासनाने आर्थिक तरतूद केली आहे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंंिधया, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
- प्रा. राम शिंदे, गृह राज्यमंत्री

Web Title: 'Tees' report for Dhangar reservation soon