शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किशोरवयीन व तरुणपिढीला रक्ताच्या कर्करोगाचा धोका, मोबाइलचा अतिवापर टाळा; कर्करोग तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:02 IST

साधारण सर्वसामान्य प्रकारचे कर्करोग किशोरवयीन आणि तरुणपिढीत ७ ते १० टक्के प्रमाणात आढळतात. मात्र, रक्ताचा कर्करोग या वयोगटांत होण्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे.

मुंबई : साधारण सर्वसामान्य प्रकारचे कर्करोग किशोरवयीन आणि तरुणपिढीत ७ ते १० टक्के प्रमाणात आढळतात. मात्र, रक्ताचा कर्करोग या वयोगटांत होण्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. त्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका किशोरवयीन आणि तरुणपिढीत वाढतो आहे, असे निरीक्षण टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. प्रा. तुषार व्होरा यांनी शनिवारी व्यक्त केले.टाटा मेमोरिअलमध्ये दोन दिवसीय किशोरवयीन आणि तरुणांमधील कर्करोग (ळअउडठ २०१७) या विषयावर ६वी राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ब्रेनट्युमर, ओव्हेरियन कर्करोग, फुप्फुस, छातीचा कर्करोग, डोके-मानेचा कर्करोगही या वयोगटात दिसून येतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या परिवाराने, नातेवाईक यांनी त्यांच्यासोबत राहणे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.तर या वेळी टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे डॉ. श्रीपाद यांनी सांगितले की, बºयाचदा लहान मुलांच्या विभागात या किशोरवयीन मुलांना जागा नसल्याने, त्यांना प्रौढ विभागात दाखल केले जाते. अशा वेळी त्या रुग्णांवरील ताण वाढल्याचे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोरील शारीरिक, मानसिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजात जनजागृती झाली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आतापर्यंतच्या संशोधनातून हे दिसून आले की, कर्करोग झालेल्या या रुग्णांच्या वयोगटाकडे काहीसे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, या रुग्णांच्या गरजा आणि आव्हाने पूर्ण करणाºया पोषक वातावरणाची गरज समाजात आहे. हे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.मोबाइलचा अतिवापर टाळा; टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्लामोबाइलमुळे आरोग्यावर होणारे परिणाम, याबद्दल अजून संशोधन सुरू आहे. टाटा रुग्णालयात झालेल्या या विषयीच्या परिषदेत कर्करोग तज्ज्ञांनी सल्ला दिला. या वेळी मोबाइलमुळे ब्रेन ट्युमर होऊ शकतो का? या विषयावर चर्चा करण्यात आली. मोबाइलमुळे आरोग्यावर होणारे परिणाम, याबद्दल अजून बरेच संशोधन सुरू आहे. लहान, तरुण आणि प्रौढ व्यक्तींमध्ये मोबाइलचा सातत्याने वापर केला जातो. यासंबंधी ‘टायकॉन’ ही परिषद शनिवारी परळ येथील टाटा रुग्णालयात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण देशातील कर्करोग तज्ज्ञ परिषदेत सहभागी झाले होते.या परिषदेतील चर्चासत्रात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्सेसच्या न्यूरो आॅन्कोलॉजी लॅबचे अधिकारी प्रभारी डॉ.वाणी संतोष सांगतात की, मोबाइलमुळे ब्रेन ट्युमर होतो हे अजून सिद्ध झालेले नाही. मात्र, काही संशोधनानुसार मोबाइलच्या अतिरिक्त वापराने दुसºया किंवा तिसºया टप्प्यातील कर्करोग होण्याचा धोका असतो.टाटा रुग्णालयातील प्रा. रेडिएशन आॅन्कोलॉजिस्ट डॉ. राकेश जलाली सांगतात की, आपण मोबाइलशिवाय राहू शकत नाही. ही लहान मुले, तरुण आणि प्रौढ व्यक्ती या अधिक प्रमाणात गॅझेट्सवर अवलंबून असतात. मात्र, तरीही मोबाइलच्या वापराविषयी काही टीप्स पाळल्या पाहिजेत. त्यात ५ ते ६ तासांपेक्षा अधिक मोबाइलचा वापर करू नये. मोबाइलची रेंज कमी असल्यास मोबाइलचा वापर करू नये, कान ओले असतील, तर मोबाइलचा वापर करू नये आणि कानाच्या जवळ जास्त वेळ फोन ठेवू नये, यांचा समावेश आहे.