तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: February 16, 2017 03:44 IST2017-02-16T03:44:40+5:302017-02-16T03:44:40+5:30
महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी बोलावलेल्या ओला कॅबच्या चालकाने तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी शिवाजीनगर परिसरात

तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न
पुणे : महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी बोलावलेल्या ओला कॅबच्या चालकाने तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी शिवाजीनगर परिसरात घडली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी मोटार थांबवत आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
संतोष तुपेरे (३०) असे चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मुंबईची आहे. ती पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षाला शिकते. मॉडेल कॉलनीमध्ये राहणाऱ्या या तरुणीने बुधवारी सकाळी आठच्या सुमारास महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी ओला कॅब बोलावली. आरोपी तुपेरे मॉडेल कॉलनीमध्ये तिला घेण्यासाठी गेला. खाली येण्यास वेळ लागल्यामुळे आरोपीने वाद घातला. यानंतर त्याने गाडी महाविद्यालयाच्या दिशेने न नेता दुसरीकडे नेली. तरुणीने त्याला गाडी महाविद्यालयाकडे घेण्यास सांगूनही त्याने न ऐकल्याने तीने आरडाओरडा सुरु केला. (प्रतिनिधी)