‘झेडपी’चे शिक्षक होताहेत ‘टेक्नोसॅव्ही’

By Admin | Updated: September 5, 2016 04:03 IST2016-09-05T04:03:12+5:302016-09-05T04:03:12+5:30

देश ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करीत असताना राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल होत आहेत

TechnoSavi is a ZP teacher | ‘झेडपी’चे शिक्षक होताहेत ‘टेक्नोसॅव्ही’

‘झेडपी’चे शिक्षक होताहेत ‘टेक्नोसॅव्ही’


पुणे : देश ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करीत असताना राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल होत आहेत आणि तेथील शिक्षकही ‘टेक्नोसॅव्ही’ होत आहेत. राज्यभरातील हजारो शिक्षकांनी विविध शैक्षणिक अ‍ॅप, व्हिडिओ, संकेतस्थळ, ब्लॉग बनवून या डिजिटल प्रवासात भाग घेतल्याचे दिसत आहे.
राज्यभरातील २५ हजार ७७४ झेपीच्या शाळा जुलैअखेरपर्यंत डिजिटल झाल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये तेथील शिक्षकांचा वाटाही मोठा आहे. झेपी शाळांतील २ हजार २८६ शिक्षकांनी विविध शैक्षणिक अ‍ॅप, ४ हजार ६३ शिक्षकांनी व्हिडिओ, तर १ हजार ३९५ शिक्षकांनी संकेतस्थळे व ब्लॉग तयार केले आहेत. परिषदेने घेतलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेतून १२ हजार ७२८ शिक्षकांनी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. झेपीच्या शाळांमधील ३५ ते ४० हजार शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: TechnoSavi is a ZP teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.