भक्तांना दिसला अश्रू ढाळणारा गणपती
By Admin | Updated: September 15, 2016 16:13 IST2016-09-15T16:13:22+5:302016-09-15T16:13:22+5:30
एकीकडे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक जल्लोशात निघाली असताना जुने सिडको, सावरकर चौक येथील कैलास पाटिल यांच्या घरातील गणपती मात्र अश्रू ढाळत असल्याचा दावा भक्तांनी केला आहे.

भक्तांना दिसला अश्रू ढाळणारा गणपती
>सतीश डोंगरे, ऑनलाइन लोकमत
नाशिक - एकीकडे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक जल्लोशात निघाली असताना जुने सिडको, सावरकर चौक येथील कैलास पाटिल यांच्या घरातील गणपती मात्र अश्रू ढाळत असल्याचा दावा भक्तांनी केला आहे.
आज गणरायाच्या विसर्जनाचा दिवस. गणेशाच्या वियोगानं अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, खुद्द गणरायचं अश्रू ढाळत असल्याचं सांगण्यात आलं आणि गणपती रडत असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
ही वार्ता पसरताच नागरिकांनी त्या ठिकाणी अक्षरशः दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.