संघाचा उद्यापासून भुसावळात वर्ग
By Admin | Updated: November 3, 2016 05:12 IST2016-11-03T05:12:43+5:302016-11-03T05:12:43+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अखिल भारतीय शारीरिक वर्गाचे ४ ते ८ नोव्हेंबरदरम्यान येथील बियाणी मिल्ट्री स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

संघाचा उद्यापासून भुसावळात वर्ग
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अखिल भारतीय शारीरिक वर्गाचे ४ ते ८ नोव्हेंबरदरम्यान येथील बियाणी मिल्ट्री स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. दर पाच वर्षांनी या वर्गाचे आयोजन करण्यात येते.
खेळ, समता, संचलन, व्यायाम-योग, सूर्यनमस्कार, दंड, नियुद्ध, विविध प्रकारचे खेळ आदी शारीरिक अभ्यासक्रमाचे नियोजन आणि त्या अनुषंगाने नवनवीन प्रयोग करणे, असे स्वरूप आहे. संघाच्या ४१ प्रांतांतील सुमारे ४६० कार्यकर्ते या वर्गासाठी येणार आहेत. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत वर्गाचे उद्घाटन होईल. (प्रतिनिधी)