संघ कुणाचाच रिमोट कंट्रोल नाही

By Admin | Updated: June 13, 2014 01:32 IST2014-06-13T01:32:55+5:302014-06-13T01:32:55+5:30

डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर

The team has no remote control | संघ कुणाचाच रिमोट कंट्रोल नाही

संघ कुणाचाच रिमोट कंट्रोल नाही

सरसंघचालक मोहन भागवत : तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप
नागपूर : डॉ. आंबेडकरांनीही संविधान लिहिल्यानंतर स्वातंत्र्य, समता ठीक आहे, पण जोपर्यंत बंधूता निर्माण होणार नाही तोपर्यंत संविधानाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असे विधान केले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता आली, पण बंधूता आली नाही. डॉ. हेडगेवार यांनीही बंधूता देशात निर्माण करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम केले. आजदेखील संघ तेच काम प्रामाणिकपणे करतो आहे. संघ कुणावरही ‘रिमोट कंट्रोल’ चालविण्याचे काम करीत नाही, असे मत रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी व्यक्त केले.
संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्गाचा समारोप आज करण्यात आला. याप्रसंगी स्वयंसेवकांना उद्देशून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे प्रणेता श्री श्री रविशंकर, महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता, संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी डॉ. विश्वनाथ लाल निगम उपस्थित होते. भागवत म्हणाले, संघ वैभवशाली आणि चारित्र्यसंपन्न भारताचे स्वप्न कार्यकर्त्यांना देतो आणि स्वयंसेवक त्यासाठी आयुष्यभर काम करतात. यंदा देशातल्या निवडणुकांत परिवर्तन दिसते आहे. लोकांना जे लोक निवडून हवे होते, ते आले. यासाठी संघाने काही केले नाही. निवडणूक आयोगाने म्हटलेलेच आवाहन संघाने केले. मतदानाचा आग्रह धरला. त्यामुळे संविधानाप्रमाणे आचरण असलेले लोक निवडून आले. पण केवळ सरकारमुळे बदल होत नाहीत. त्यासाठी समाज आणि राष्ट्र जागृत असले पाहिजे.

Web Title: The team has no remote control